We are bridging the healthcare gap in underserved villages through mobile clinics, awareness drives, and state-supported initiatives.
June 10, 2025
1 of 3
Policy Meet on Public Health
Key stakeholders gathered to discuss strategies for improving primary healthcare delivery and implementing state policies effectively.
March 15, 2025
1 of 3
मॅग्मोचा इतिहास
महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ संघटना अर्थात मॅग्मो चा इतिहास प्रेरणादायी आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीस राज्यभरातील शासकीय वैद्यकीय अधिकारी अनेक अडचणींशी सामना करत होते. सेवाशर्ती अनिश्चित, बढत्या विलंबित आणि बदली मनमानी स्वरूपात होत असत. १९६५-७० च्या सुमारास संघटनेचे प्रयत्न झाले होते, पण ते स्थिर स्वरूप घेऊ शकले नाहीत.
या अशा कठीण काळात डॉ. सुजाता ढवळे या झुंजार आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्या पुढे आल्या. त्यांनी न डगमगता संपूर्ण महाराष्ट्र फिरून वैद्यकीय अधिकाऱ्यांना एकत्र केले. त्यांना सोबत होती डॉ. डि. डि. शिंदे यांची. दोघांनी मिळून गावोगावी, शहरोगावी दौरे करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना संघटीत करण्याचे काम केले.
महाराष्ट्र राज्य गट-अ शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या नूतन अध्यक्ष म्हणून काम करताना अभिमान वाटतो. ही संघटना आरोग्य सेवेत कार्यरत समर्पित अधिकाऱ्यांची आहे, जी संपूर्ण राज्यात अविरत सेवा करत आहे. या वर्षी, संघटनेचा मुख्य उद्देश एकता, पारदर्शकता आणि व्यावसायिक प्रगती यावर आधारित आहे. आपण सर्व मिळून संघटनेचा आवाज बळकट करू, अधिकारी हक्क सुरक्षित करू आणि सेवा सुधारू.