अलीकडच्या काळात सरकारी डॉक्टर आणि सरकारी दवाखान्यावर विश्वास कमी झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे डॉक्टर हे सुध्दा ग्रामीण पातळीवर सरकारी नोकरी करण्याकरीता तयार नाहीत. त्याचे अद्याप प्रशासनाने असो वा कोणत्याही पक्ष्याचे सरकार असो कोणीही याकडे लक्ष दिलेले नाही. सरकारी डॉक्टर किती महत्वाचे आहेत व सरकारी आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे महत्व हे पहिल्यांदा कोरोना काळामध्ये सर्वांना कळाले. खरे पाहता काही वर्षा पूर्वी ही परिस्थिती नव्हती. साधारणता २० वर्षा आधी जनसामानांना सरकारी दवाखान्यावर व सरकारी डॉक्टर वर संपुर्ण विश्वास होता.
सुप्रसिध्द मेडिकल महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर हे आपापल्या जिल्ह्यात येवून सरकारी दवाखान्या मध्ये नोकरी करायला सुरुवात करायचे. ते त्या संपुर्ण जिल्ह्यासाठी, तालुक्यातील किंवा गावासाठी संपुर्ण पणे समर्पित असायचे. इतकेच नाही तर जास्तीत जास्त डॉक्टर हे सायंकाळी त्याच्या घरी देखील रुग्ण पाहत असत. काही ठिकाणी गावातील जेष्ठ नागरिक हे त्यांना खाजगी दवाखाना देखील फावल्या वेळात चालवावा म्हणून जागा देखील देत असत. त्यामुळे जास्तीत असत वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालायीच राहत व २४ तास सेवा देत असे. त्यामुळे गावातील तसेच सर्व पातळीवर वैद्यकीय अधिकारी हे उपलब्ध देखील होते व जनसामान्यामध्ये त्यांना प्रचंड आपुपली होती. बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातुन आलेले वैद्यकीय अधिकारी हे जिथे नोकरी लागली तिथेच स्थायी देखील झाले आहे. याचे अनेक उदाहरण हे आपल्या समोर दिसून येतील. त्याचप्रमाणे वैद्यकीय पेशा असल्यामुळे स्थानिक प्रतिनिधी व गावातील लोक हे वैद्यकीय अधिकारी यांना हवी ती मदत करत होते व त्यांना जेवण, राहावयाची घर देखील देत असत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहसा गोरगरीब परिस्थिती मधून शिकलेली मुले-मुली एम.बी.बी.एस. करत असत त्यामुळे डॉक्टर झाल्यावर त्यांच्या अपेक्षा देखील खूप जास्त नसायच्या. या काळामध्ये खाजगी दवाखाने देखील जास्त नव्हते त्यामुळे महाराष्ट्रातील सरकारी आरोग्य यंत्रणा ही अतिशय उत्तम व सक्षम यंत्रणा होती. त्यामुळे आपण त्यावेळी देखील वेळोवेळी आलेल्या साथीच्या रोगांवर मात करु शकलो. परंतु वाढती खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, त्यातुन लाखो आणि करोडो प्रवेश शुल्क भरुन एम.बी.बी.एस., एम.डी. करण्याचे प्रमाण वाढले, त्यामधुन निघालेले डॉक्टर यांना शासकीय यंत्रणे मध्ये येण्यापेक्षा स्वबळावर खाजगी दवाखाने उभारणे व त्यामधुन जास्तीत जास्त फायदा मिळवणे सोपे होते. वेळोवेळी आलेल्या साथीच्या रोगांवर मात करु शकलो. परंतु वाढती खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, त्यातुन लाखो आणि करोडो प्रवेश शुल्क भरुन एम.बी.बी.एस., एम.डी. करण्याचे प्रमाण वाढले. त्यामधुन निघालेले डॉक्टर यांना शासकीय यंत्रणे मध्ये येण्यापेक्षा स्वबळावर खाजगी दवाखाने उभारणे व त्यामधुन जास्तीत जास्त फायदा मिळवणे सोपे होते. खाजगी दवाखान्यासोबत च मल्टीस्पेसिअलिटी हॉस्पिटल हे कार्पोरेट सेक्टर ने उभारले ज्यामध्ये अनेक डॉक्टर नसलेल्या व्यावसायिकांनी देखील गुंतवणुक करणे सुरु केले व जनसामान्यांना आकर्षिक केले. हळुहळु सरकारी डॉक्टरांना देखील मल्टीस्पेसिअलिटी हॉस्पिटल मध्ये शासनापेक्षा दुप्पट-तिप्पट पगार देवून कामावर ठेवुन घेतले. हे सर्व घडत असतांना जे डॉक्टर या सेवा शासकीय यंत्रने मध्ये असतांना मोफत देत होत त्याचे सेवेसाठी जनसामान्यांना पैसे मोजावे लागू लागले.
शासकीय यंत्रणे मध्ये नियमित पणे डॉक्टरांची कमी होत असलेली संख्या यावर मागील जवळपास १५ ते २० वर्षापासुन लक्ष का दिलेले नाही? हि एम गंभीर बाब आहे याचे जबाबदार कोण? आजच्या जागतिक महामारी मध्ये शासकीय यंत्रणेमध्ये अतिशय अल्प डॉक्टर आहेत त्याला जबाबदार कोण? शासनाचे धोरण हे वैद्यकीय क्षेत्राकडे कमी का होते? कदाचित हि महामार २०२० मध्ये नसती तर हे कोणाला कळाले देखील नसते की सरकारी डॉक्टर खर्च कमी आहेत.
अडचणी व समस्या या असंख्य आहेत परंतु शासकीय यंत्रणेत डॉक्टर का येत नाहीत त्याबाबत प्रकाश टाकू इच्छितो.
शासकीय यंत्रणेमध्ये येणारे वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या परिस्थितीमुळे येतात व गरिबीतुन शिकलेले डॉक्टर च येतात. त्यापुर्वी त्यांना कोणताही अनुभव नसतो. त्यामुळे त्यांना समजुन घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे. एक ते दोन वर्षा नंतर त्यांना स्थानिक लोकांचा व आरोग्य यंत्रणेचा अंदाज येतो. सुरवातीचे २ ते ३ वर्ष जर लोकांनी व शासनाने वरील अडचणी याचे निराकरण केले तर नक्कीच आपल्या रिक्त असलेल्या आरोग्य यंत्रणेमध्ये लवकरच वैद्यकीय अधिकारी येतील. सर्व वैद्यकीय अधिकारी सर्व बाबतीत परिपकव असतात असे नाही परंतु वरील काही साध्या व सोप्या अडचणीचे निराकरण शासनाकडुन अतिशय तत्परतेने व प्राधान्याने झाले तर नक्कीच आपली आरोग्य यंत्रणा पुर्वी सारखी सक्षम होईल अशी आशा व्यक्त करतो. शासनाने या कोरोना काळात तरी आता या गंभीर विषयाला समजून घेवून निराकरण करणे आवश्यक आहे अन्यथा या प्रश्नांचे निराकरण कधीच होणार नाही.
---------------------------------------------
प्रेम करतोस माझ्यावर, मला पण करू देत जा...
प्रेम करतोस माझ्यावर, मला पण करू देत जा...||
...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!
---------------------------------------------
बाहेर कामावर जातांना सर्व तयारी करून पाठविते...
जणू काही शाळेत जाताना आई करायची तेच आठवते...||
माझे काम मला कधी तरी करू देत जा...
...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!
---------------------------------------------
ओ.पी.डी. ला असताना पण ,मेसेज करून काही विसरले हे सांगते...
आता परत येणार कसे ? हे उत्तर देखील तूम सांगते...||
जमलं..तर तू पण ओ.पी.डी. ला सोबतच येत जा...
...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!
---------------------------------------------
तू पण डॉक्टर मी पण डॉक्टर,पॅशंट चे TREATMENT मात्र मलाach विचारते...
मी सांगितल्यावर...हे तर मला आधीच माहित होत असं सांगते...||
माझा इलाज मात्र तूच करत जा...
...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!
---------------------------------------------
मी मोठा तू लहान ,तरी तुलचबर असते...
म्हणूनच लोकं म्हणतात,जसं दिसते तसंच नसते...||
माझे बरंच नसले तरी निदान ऐकून तरी घेत जा...
...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!
---------------------------------------------
असे मित्र नकोत,मैत्रिणी तर बिलकुल नसाव्यात...
मित्र-मैत्रिणी नाही ना, फक्त आठवणीत तरी असाव्यात...||
नाईट मधली थर्टी तू पण कधी भेट जा...
...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!
---------------------------------------------
अश्रिंच रहा मैत्रिणी सारखी,सर्व सुख:दुख:त आयुष्यमर..
हे जग देखील वाटते लहान,तुझ्यास त्या हसऱया गालासमोर...||
नेहमी मला तसाथ अश्रिंच देत जा...
...बायको .....मला थोड तरी सिरीयसली घेत जा..!!